अगं बाई उपवास मोडला
- मोहनीश देशपांडे
"अगं बाई उपवास मोडला" किंवा "अरेच्या उपवास मोडला " असे वाक्य कधी न कधी प्रत्येक घरात ऐकायला मिळते. आपली समज अशी आहे की अन्न खाल्ल्यावर उपवास मोडतो. पण ज्याला उपवासाचा खरा अर्थ माहित आहे ती व्यक्ती अन्न टाळत नाही. मुळात बऱ्याच लोकांना उपवासाचा अर्थ माहित नसतो. अनेक वर्ष उपवास करून देखील जीवनात विघ्न येतात. मग ती दूर करण्यासाठी
|
तीर्थक्षेत्री जाउन ना ना प्रकारच्या पूजा- विधी कराव्या लागतात. हजारो उपवास केल्यानंतर ही विघ्न, संकटं का येतात ? एवढे उपवास करून ही पुण्य का मिळत नाही ? या प्रश्नांची अगदी सरळ उत्तरं आहे. जे लोक अन्न टाळून उपवास करतात ती मुळात उपवास करत नाही. उपवास म्हणजे काय ? उप = दुसरा, वास = वासना ! दुसऱ्याची किंवा गरीबाला अन्न दान करून त्याची अन्नाची वासना तृप्त करून त्याचा आत्मा संतुष्ट करणे ! तो खरा उपवास ! मग त्या दिवशी तुम्ही स्वतः उपाशी राहतात की फराळाचे पदार्थ खातात की गुलाबजामून खातात त्याच्याशी परमेश्वराला काहीच कर्तव्य नाही. या उलट उपवासाच्या दिवशी आपण उत्सुकतेने विचारतो की आज फराळाला काय केले आहे ? म्हणजेच फराळाचे चमचमीत पदार्थ खाऊन आपण आपली वासना संतुष्ट करतो. साबुदाण्याची खिचडी, चटकदार दही, तळलेले बटाट्याचे पापड, सर्व चविष्ट पदार्थ पोटभर खातो. मस्त पैकी एक ग्लास ताक पिऊन सोफ्यावर आडवं होऊन क्रिकेटची मॉच पहात बसतो. या सर्व क्रियांमध्ये आपण गरीबाची भूक न भागवता स्वतःचीच भूक भागवतो. सर्व उपवासाच्या फराळाचे सेवन करतो आणि अभिमानाने मान वर करून सांगतो की आज आमचा उपवास आहे ! वास्तविक दृष्टीने पाहिलं तर यात एक ही पुण्य आपल्या हातून घडत नाही. मात्र पूर्वसंचीत असलेल्या पुंण्याचा उपभोग घेण्यात सर्व आयुष्य निघून जातं पण खरा उपवास आपण कधीच करत नाही. मग जेव्हा संकटं येतात किंवा कार्य घडत नाही, अडचणी येतात आणि मार्ग दिसत नाही तेव्हा आपण जोतीष्याकडे जाऊन आपली चिंता व्यक्त करतो.
"आमच्या मुलीचं लग्न कधी होईल ? सारखे नकार येत आहे तिला." किंवा "आमच्या मुलाला नोकरी कधी मिळेल ? प्रमोशनचे योग आहेत का ? मग जोतिष्य आपल्याला उपवास करायला सांगतात. मग परत तेच !
आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या लोकांना उपवास करायला सांगतात त्या लोकांनी रोजच्या तेलकट तुपकट आणि मसालेदार जड़ पदार्थांपासून पोटाला आठवड्यातून एक दिवस विश्रांती द्यावी असा हेतू त्याच्या मगे आहे. त्या दिवशी गरीबाला अन्न दान करून स्वतः केवळ फलाहार करावा आणि त्या दिवशी देवाचं नामः स्मरण करावं, भजन करावं, प्रवचने ऐकावी, पोथी-पुराण वाचावं अशा रीतीने भक्ती आणि आरोग्य दोन्ही साध्य करता येतं. गरीबाला दान केल्याने पुण्य मिळेल, पोटाला विश्रांती देऊन फलाहार आणि दूध याचे सेवन केल्याने शरीरात स्फूर्ती शक्ती येईल, आरोग्य लाभेल, आयुष्य लाभेल आणि देवाची भक्ती केल्याने मन प्रसन्न होईल आणि विचार शुद्ध होतील. सद्विवेक बुद्धी जागृत होईल. आयुष्य अगदी सुंदर आणि छान वाटेल. ज्या लोकांना उपवास सहन होत नसेल त्यांनी नियमित भोजन करून गरीबाला ही अन्नदान करावे. 'अन्न हे पूर्णब्रम्ह' असे शास्त्रात विधान आहे. ज्या प्रमाणे आत्महत्त्या करणं महापाप आहे त्याच प्रमाणे भूक लागली असून ही उपाशी राहून देह जाळणे ही महापापच आहे.
सामान्य माणूसच नव्हे तर नव नारायणाचे अवतार, दत्त संप्रदायातले मच्छिंद्रनाथांने देखील अन्नाला पाठ फिरवली नाही. नवनाथांच्या पोथीमधल्या नवव्या अध्यायात असे सांगितले आहे की मच्छिंद्रनाथांनी आपल्या शिष्य गोरक्षनाथांना भिक्षा मागायला पाठवले. ते ज्या घरी भिक्षा मागायला गेले तेथे श्राद्धाचे जेवण सुरु होते. एका गृहिणीने पूर्ण थाळी चमचमीत पदार्थांसह त्यांना दिली. त्या थाळीत भरडाचे वडे होते. मच्छिंद्रनाथांना ते वडे खूप आवडले आणि त्यांनी गोरक्ष नाथांना अजून वडे घेऊन येण्याची आज्ञा केली. या गोष्टी वरून सिद्ध होते की भूक लागल्यानंतर उपवासाच्या नावाखाली देह जाळू नये. अन्नाला पाठ फिरवू नये नाहीतर अन्नपूर्णा म्हणजेच पार्वती देवीचा अपमान होतो. श्री कृष्णाने अर्जुनाला गीतेत हाच उपदेश केला होता की जीवनत स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधता आले पाहिजे. भूक लागली की भोजन करणे आणि गरिबाला ही अन्नदान करणे यात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधता येतं. शास्त्राप्रमाणे सात्विक अन्नालाच 'परब्रम्ह' म्हटले आहे. अशा रीतीने उपवास करण्यापूर्वी त्याच्या मागचा हेतू आणि खरा अर्थ जाणून घेणे आवश्यक आहे.